दि.३१ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
भारतीय स्त्री शक्ती पिंपरी चिंचवड आयोजित नाते तुझे माझे – सावित्री युवा मेळावा शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी येथे सकाळी ९ ते ११ दरम्यान उत्साहात संपन्न झाला.
मेळाव्यात प्रमुख वक्त्या डॉ. स्मिता जोशी यांनी
‘नाते तुझे माझे’ हा विषय खूपच सुंदर उलगडत नेला. तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलींच्या मनातील भाव त्यांनी खूप सुंदर मांडले. ह्या वयात मुलींच्या मनात चालू असलेली उलथापालथ, आई- वडिलांशी असलेल नातं, त्यात मित्र मिळाले तर त्यांच्याशी असलेल्या नातं. प्रेमात पडलेल्या तरुणाईचे भावविश्व, त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत, त्या समस्यांना कसे सामोरे जायचे तसेच वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, कुठेतरी, कुणाशी तरी भरवश्याच्या व्यक्तींशी संवाद साधला पाहिजे आणि मोकळे झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. संवाद हा सर्व समस्यांवर उपाय असल्याचेही त्यांनी विषद केले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक, अन्य कर्मचारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैशाली मराठे यांनी तर वक्त्यांचा परिचय शिल्पा बिबीकर यांनी केला. आभार मनाली जोशी यांनी मानले.
कार्यक्रमास निवेदिता कच्छवा, लता राऊत, नीला मनोहर, शुभांगी रामटेक उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर पी सी इ टी इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ साठी स्मिता जोशी यांचा पॉडकास्ट देखील करण्यात आला असल्याची माहिती भारतीय स्त्री शक्ती तर्फे देण्यात आली.

