पुणे दि.२९ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री, लोकनेते अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे पुणे व्यापारी महासंघाने पत्रक जारी करीत त्यांच्या कुटुंबियांप्रती, आप्तस्वकीय व असंख्य चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त करीत, लोकनेते अजितदादांना श्रद्धांजली म्हणून गुरुवार दि.२९ जानेवारी रोजी पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने संपूर्ण दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघातर्फे घेण्यात आल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
पिंपरी चिंचवड राहणार बंद
पिंपरी चिंचवड शहरातील देखील प्रतिष्ठाने, दुकाने, व्यापारी संकुले देखील आज गुरुवार दि.२९ जानेवारी रोजी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून लाडक्या लोकनेत्याला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
राजकीय नेत्यांसह अनेकांची बारामतीला धाव…
शहरातील राजकीय वर्तुळातील नेते, कार्यकर्त्यांसह अनेकविध सामाजिक कार्यकर्ते देखील आपल्या लाडक्या लोकनेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बारामतीला रवाना झाले आहे.

