दि.२८ (सिटीनामा वृत्तसेवा)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
मुंबईहून अजितदादा पवार हे आज बारामतीकडे निघाले होते. बारामतीमध्ये उतरत असतानाच त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले.
विमानामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे चार सुरक्षारक्षक होते, अशी माहिती समोर आली आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे राज्यासह देशात शोककळा पसरली आहे.
