ब्लूमिंग इंटरनॅशनल शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्य विविध कार्यक्रम

Share this News

मामुर्डी दि.२६ (सिटीनामा वृत्तसेवा)

शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले यावेळी
प्रमुख पाहुणे आयर्नमॅन महेश भेगडे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अँड.निखिल बोडके, उपाध्यक्ष शांताराम बोडके, दीपक बोडके, सूर्यकांत बोडके, मुख्याध्यापिका विजिला राजकुमार यांच्यासह अनेक मान्यवर, पालक, परिसरातील नागरिक, युवावर्गाची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे महेश भेगडे यांनी खेळ या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले शरीर सुदृढ असेल तर मन प्रसन्न राहते, आणि शरीर सुदृढ ठेवायचे असेल तर सर्वात मार्ग म्हणजे खेळ! मुलांनी दूरचित्रवाणी (टीव्ही), मोबाईल स्क्रीन पाहणे कमी करून मैदानावर खेळ खेळण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मान्यवरांचा शाळेतर्फे सन्मान करण्यात आला.त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ब्लूमिंग इंटरनॅशनल शाळेमध्ये उत्कृष्ट शिक्षणासह, लेखन वाचन, सर्वांगीण विकास व खेळ या विषयावर विशेष लक्ष दिले जात असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *