– इंडियन म्युझिकल क्लब चे आयोजन
निगडी दि.२४ (सिटीनामा वृत्तसेवा)
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला
इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत गाता रहे मेरा दिल या उपक्रमांतर्गत ‘ये दिल है हिंदुस्थानी’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.२५ जानेवारी रोजी सायंकाळी ४.४५ वाजता निगडी प्राधिकरण (पिंपरी चिंचवड) येथील ग.दि.माडगूळकर सभागृहात (छोटे सभागृह) करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रसिकांसाठी मोफत असून कार्यक्रमाला लायन्स क्लबचे राजेश अग्रवाल, अनिल झोपे, मनीष गोखले, राखी झोपे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात राजकुमार सुंठवाल, प्रमोद शर्मा, गणेश ओव्हाळ, सागर पाटील, शहाजी कांबळे, मंगेश उंबराणी, प्रशांत कुलकर्णी, अमित पांचाळ, निलेश मोरे, दत्तात्रय कुंभार, कविता शाह, मुक्ता सानवी, रुपाली मिरासदार, संकल्पा वाघमारे, दीपा कोंडलेकर आदी गायक मंडळी आपली गायन कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन इंडियन म्युझिकल क्लब, लायन्स क्लबतर्फे करण्यात आले आहे.
