‘युवक सप्ताहा’निमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्त पिशव्यांचे वाटप; लाईफ लाईन ब्लड सेंटरचा स्तुत्य उपक्रम

Share this News

पिंपरी-चिंचवड दि.२३ (सिटीनामा वृत्तसेवा) स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या ‘युवक सप्ताहा’चे औचित्य साधून, लाईफ लाईन ब्लड सेंटर,सोमटणे फाटा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,पिंपरी-चिंचवड महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत, परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना तातडीच्या परिस्थितीत रक्ताची कमतरता भासू नये, या उद्देशाने दि. २१ जानेवारी २०२६ ते ०२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोफत रक्त पिशव्या (Free Blood Units) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि गरजू विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्लड सेंटरचे अध्यक्ष सुनील नाईकनवरे व सचिव नामदेव पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *