– स्व.दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे सेवाकार्य
आळंदी दि.२६ (सिटीनामा वृत्तसेवा)
स्व.दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था मागील २५ वर्षांपासून सेवा, वाड्:मय, समाजप्रबोधन या माध्यमातून पुणे जिल्ह्यात सेवाभावी कार्य करीत आहे याचाच एक भाग म्हणून श्री क्षेत्र आळंदी येथे रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र दि.२६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आळंदी बस स्थानकासमोर सतीश चोरडिया यांच्या दुकानामागे सुरू होत आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त श्री योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोदजी बन्सल, आळंदी गट कार्यवाह किरीट पटेल उपस्थित राहणार असून कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग सेवा प्रमुख सुरेशजी कोबल प्रमुख वक्ते हे मार्गदर्शन करणार आहेत. सेठ कांतिलाल नंदराम चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विशेष सौजन्याने सुरू होत असलेल्या या महत्वपूर्ण सेवाकार्य उद्घाटन समारंभास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून गरजूंना या वैद्यकीय सेवा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन स्व.दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी संस्थेतर्फे केले आहे.


