आज माघी श्री गणेश जयंती

Share this News

दि.२२ जानेवारी ( सिटीनामा वृत्तसेवा)
आज माघ शु.४ दि. २२ जानेवारी २०२६, माघी गणेश जयंती! या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. माघी गणेश जयंती निमित्त देशभरात उत्साह असून विशेषतः महाराष्ट्रातील अष्टविनायक, मुंबई येथील श्री सिद्धिविनायक, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, चिंचवड येथील श्री मोरया गोसावी, नागपूर येथील श्री टेकडी गणपती, श्रीक्षेत्र गणपतीपुळे यांसह विविध श्री गणेश स्थानी बाप्पांची विधिवत पूजा होऊन लक्षावधी गणेश भक्त दर्शनासाठी रीघ लावत आहेत.

माघी श्री गणेश जयंती चे महत्व

पौराणिक कथेनुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्री गणपतीचा जन्म झाला. म्हणूनच या दिवशी “गणेश जयंती” साजरी केली जाते.स्कंद पुराणानुसार, या दिवशी श्री गणेशाने कश्यप ऋषींच्या पोटी ‘विनायक’ या नावाने अवतार घेतला आणि नरांतक नावाच्या राक्षसाचा वध केला.
  या दिवशी गणपतीची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. सिटीनामा तर्फे सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *