पिंपरी / पुणे दि.३१ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
येथील नाथपंथी डवरी सामाजिक संस्था, काळेवाडी यांच्या वतीने गुरु पौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड परिसरातील नाथपंथी समाज बांधव-भगिनी तसेच मोठ्या संख्येने नाथभक्त उपस्थित होते.

सकाळी श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या मूर्तीचे वैदिक मंत्रोच्चारात चरणपूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरती, सामुदायिक भजन आणि प्रसाद वाटपाने वातावरण भक्तिमय झाले होते. सर्व नाथपंथी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या श्री गुरु गोरक्ष नाथ महाराज यांच्या प्रतिमा उपस्थित मान्यवरांना भेट देण्यात आल्या.
या प्रसंगी नाथ समाजाच्या एकतेचे महत्त्व आणि सामाजिक भान जपण्याच्या हेतूने समाज प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाला महिलांची आणि तरुणांची लक्षणीय उपस्थिती होती.

मान्यवरांची उपस्थिती
यावेळी ऍड.मंगेश नढे, ऍड.हर्षद नढे, ऍड.मुकुंद यदमल, सोपान कुलकर्णी, संजय हटकर, उमाताई पवार, काळुराम नढे, अशोक पवार, संजय कदम, राजूभाऊ निकम, भैरवनाथ नार्वे, गोरख कदम, प्रशांत डवरी, किरण जाधव, कृष्णा डवरी, सोमनाथ निकम, निलेश डवरी, संतोष डवरी, सोमनाथ जाधव, राकेश पवार, दत्ता नार्वे यांच्यासह महिला कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि सद्गुरू भजन मंडळ उपस्थित होते.
प्रसाद सेवा
चंद्रकांत धोगडे आणि अशोक ठोसर यांच्या वतीने गोड प्रसादाची सेवा देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन नाथपंथी डवरी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद आणि स्थानिक नागरिकांनी केले.
