आकुर्डी दि.२४ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त आयोजित जनसेवा सप्ताह म्हणून गुरुवार दि.२३ जुलै २०२६ रोजी आकुर्डी येथील महापालिकेच्या ह. भ. प कै. मल्हारराव कुटे हॉस्पिटल येथे “प्रयास फाउंडेशन” च्या वतीने महिलांसाठी कर्करोग तपासणी, गर्भाशय पिशवी (मुख) तपासणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले .
यावेळी नगरसेवक प्रमोद कुटे नगरसेविका वैशालीताई काळभोर , नगरसेविका अरुणाताई लंगोटे , सामाजिक कार्यकर्ते विशाल काळभोर , गणेश लंगोटे , डॉ बाळासाहेब होडगर, डॉ . हरिदास शेंडे , डॉ . धीरज तायडे , डॉ . दीपक चौधरी , फिनिशियन शाहीन खान , नारायण जायभाय पदाधिकारी व कार्यकर्ते आणि रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. महिलांनी सदर आरोग्य तपासणी सेवेचा लाभ घेतला.
