मागणी: दिवंगत नेते अजितदादांच्या प्रतिमा महापालिका शाळेत लावाव्या – काळभोर

Share this News

चिंचवड दि.२० जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या कार्याचे स्मरण म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व शाळांमध्ये स्व.अजितदादांच्या तसबिरी लावण्यात याव्या अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी विधानसभा अध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस युवा नेते विशाल काळभोर यांनी पिंपरी चिंचवड महापालिका महानगर पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिवंगत नेते स्व.अजितदादा पवार यांची कामाचा माणूस ही प्रतिमा आहे त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. तत्पर कार्यपद्धती, प्रशासकीय पकड, समाजातील प्रत्येक घटकाप्रती आस्था, प्रचंड लोकसंग्रह पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असून पालिका प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन स्व.अजितदादांचे प्रेरणादायी कार्याची माहिती होण्याच्या उद्देशाने त्यांची प्रतिमा लावण्याची मागणी विशाल काळभोर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *