चिंचवड दि.१० जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
चिंचवड मधील योगदान प्रतिष्ठानतर्फे प्रभाग क्र.१८ मधील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांचे कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. इयत्ता दहावी मधील १७४ उत्तीर्ण विद्यार्थी व इयत्ता बारावी मधील उत्तीर्ण ६८ विध्यार्थी यांचा गुणगौरव तसेच सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती देवी पूजन, दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी योग्य प्रकारचे मार्गदर्शन पुणे जिल्ह्यातील नामवंत मार्गदर्शक पुणे शहर सजग नागरिक मंचाचे प्रमुख विवेकजी वेलणकर यांनी सहज व सोप्या शब्दात मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रपती पुरस्कार विजेते ह.भ. प.किसनमहाराज चौधरी यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.योगदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्यमान नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रसंगी पिंपरी चिंचवड शिक्षण समिती अध्यक्षा रवीना आंघोळकर, माजी महापौर अपर्णाताई डोके, नगरसेविका मनीषाताई चिंचवडे, भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्रजी देशपांडे, क्रांतिवीर स्मारक समितीचे सदस्य गतिरामजी भोईर, रवींद्र प्रभुणे, सोनाताई गडदे, दीपालीताई कलापुरे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबर चिंचवडे यांनी केले व आभार प्रदर्शन विजयकुमार बोरसे सर यांनी केले.
कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी पालक, मान्यवर प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

