आकुर्डी दि.२७ जून (सिटीनामा वृत्तसेवा)
जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघ , (काळभोरनगर ) यांची जून महिन्याची मासिक सभा दिनांक २५ जून रोजी संपन्न झाली .
यावेळी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष विठ्ठल रामचंद्र काळभोर आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उर्फ माऊली कुटे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते तर सभेच्या अध्यक्षस्थानी सुजाताताई पाटील होत्या आणि संघाचे अध्यक्ष खंडेराव काळे होते .
सभेची सुरवात अंजलीताई मोरे आणि महिला सहकाऱ्यांसह प्रार्थने करण्यात आली .सभेला संबोधित करतांना विठ्ठल काळभोर म्हणाले जीवन आधार या शब्दातच एकमेकांना आधार आहे . हा आधार असाच कायम एकमेकांना देत , ज्येष्ठांनी सुख – दुःखाची देवाण – घेवाण करावी असे प्रतिपादन केले तर ज्ञानेश्वर कुटे यांनी संघाच्या कार्याला शुभेच्छा देत संघासाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .
संघाचे संस्थापक विशाल काळभोर यांनी संघाच्या स्थापनेपासून ते आज पर्यंतचा यशस्वी प्रवास मांडतांना विशेषता महिला भगिनींच्या उपस्थितीचे कौतुक केले त्याच बरोबर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष खंडेराव काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी सुमारे ४२ ज्येष्ठ सभासदांचे वाढदिवस साजरे करीत त्यांना वाढदिवसाची भेट , अतिथी विठ्ठल काळभोर आणि माऊली कुटे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आली .
यावेळी नेहमी प्रमाणे लकी ड्रॉ काढण्यात आला . त्यात कमलताई धाईंजे या भाग्यवान सदस्या ठरल्या .
विशाल काळभोर यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भावनेतून उपस्थित सर्व ज्येष्ठांना छत्री वाटप केले .
कार्यक्रमाचे संयोजन विजय निकम , एकनाथ कालेकर , रवींद्र मांजरेकर , विजय सुर्वे यांनी केले सभेचे नियोजन आणि सूत्र संचालन प्रकाश परदेशी यांनी केले ,कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इब्राहिम शेख , सचिन मोकाशी , गणेश चव्हाण, दीपक गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले .
