महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्य शिवसेनेतर्फे अभिवादन

Share this News

आकुर्डी दि.२ मे (सिटीनामा वृत्तसेवा)
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहर शिवसेनेतर्फे निगडी येथील बजाज ऑटो मधील शहीद कामगार नेते कै. दत्तात्रय पाडाळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

शिवसेना पिंपरी चिंचवड शहर, शिवसेना कामगार सेना, युवासेना पिंपरी चिंचवड शहर, व शिवसेना श्रमिक सेनेच्या वतीने हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारा आणि जनसामान्यांचा पक्ष म्हणून शिवसेना सदैव गोरगरीबांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढरकर, युवासेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख चेतन बेंद्रे,
शिवसेना सोशल मीडिया टीम पिंपरी विधानसभा प्रमुख राजीव मेनन, युवासेना पिंपरी विधानसभा प्रमुख अनिश काळभोर, शिवसेना पिंपरी विधानसभा प्रमुख कैलास आबा दुर्गे, शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक के. के. काळे तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्य अनेक ठिकाणी आयोजित विविध कार्यक्रमांना प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *