श्रीगुरु गोरक्षनाथ जयंती भक्तिभावात; विविध कार्यक्रम उत्साहात

Share this News

पिंपरी दि.१५ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)
नाथपंथी डवरी सामाजिक संस्था, तरुण मंडळ यांचे वतीने
पिंपरी चिंचवड शहरातील
श्री गुरु गोरक्षनाथ मंदिरात जयंती उत्सव उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाला.

यावेळी नाथपंथी समाज व सर्व नाथभक्त समाजातील बंधू भगिनी परिवार व प्रमुख पाहुणे भाई विशाल जाधव,आनंदा कुदळे, सोपान कुलकर्णी, मुकेश ओतारी, अशोक ठोसर, तसेच नगरसेविका कोमल काळे यांच्या हस्ते महाआरती झाली. सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती आशा पवार याच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे याच्या हस्ते महापुरुष पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच नाथपंथी डवरी सामाजिक संस्था पि. चि. चे पदाधिकारी उपाध्यक्ष संजय कदम, कार्याध्यक्ष राजूभाऊ निकम, सचिव भैरवनाथ नार्वे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कार्यगौरव सन्मान चिन्ह देऊन केले. तसेच प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवरांच्या उपस्थित महा आरती करण्यात आली. सर्व समाजातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ललित कासार यांनी सर्व समाज बांधव व आलेले सर्व नाथभक्त याचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *