पुनावळेत रविवारी विराट हिंदू संमेलन

Share this News

पुनावळे दि.११ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)
पुनावळे गावठाण परिसरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू एकता दृढ करण्याच्या उद्देशाने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे संमेलन रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता श्रीराम मंदिर, पुनावळे गावठाण येथे आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून हिंदुत्वाची मुलुख मैदानी तोफ कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि ओजस्वी वक्ते मा. मिलिंदभाऊ एकबोटे अध्यक्ष, समस्त हिंदू आघाडी उपस्थित राहणार आहेत.

तसेच कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, भारतीय स्त्री शक्ती सौ. निवेदिता ताई कच्छवा यांची विशेष उपस्थिती लाभणार असून अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मुख्य सचिव ह.भ.प.महावीर महाराज सूर्यवंशी यांचे आशीर्वचन लाभणार आहे.

हिंदुत्वाचा विचार दृढ करण्यासाठी आणि समाजात एकात्मता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या संमेलनास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक सकल हिंदू समाज, पुनावळे गावठाण वस्ती स्वागत समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *