पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये अवकाळी पाऊस; अनेक ठिकाणी गारपीट

Share this News

पुणे/ पिंपरी चिंचवड दि.३० मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)

मार्च महिना संपता संपता कडक उन्हामुळे प्रचंड उकाडा सुरू झाला होता अचानक सोमवारी दुपारपासून पुण्यासह पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा सुटून मुसळधार पाऊस सुरु झाला. अनेक भागात प्रचंड गारपीट झाल्याने तूर्तास नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला असला तरी शेती भागात मात्र नुकसान झाल्याचे चित्र आहे.

आंब्यासह फळबागांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक भागात पाणी साचले होते तर वाहतुकीला वाहतुकीला देखील फटका बसून खोळंबा झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात एकदम बदल होऊन थंडावा आला आहे. अनेक भागात झाडे पडली असून लगेचच ती बाजूला देखील करण्यात आली असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *