आज श्रीरामनवमीचा उत्साह…!

Share this News

शोभायात्रांसह विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे दि.२६ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)

चैत्र शुद्ध नवमी तिथी म्हणजेच राष्ट्रपुरुष भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव..!!

यादिवशी श्री क्षेत्र अयोध्येसह देशभर उत्साहाचे वातावरण आहे. दुपारी ठीक १२ वाजता प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला जाणार असून ठिकठिकाणी श्रीराम कथा वाचन, रामायण, सुंदरकांड, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड शहरातील देहूरोड, देहू, मोशी, चिखली, चिंचवड, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या भागात भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध श्रीराम मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांबरोबर व्याख्याने, कीर्तने, रक्तदान – आरोग्य तपासणी शिबिरे देखील आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.

राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या सर्व वाचक, हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा !!

प्रभू श्रीराम आरती

श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम

श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम !!

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ॥

श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ धृ ॥
कनकाचे ताट करी धनुष्यबाण ।
कनकाचे ताट करी धनुष्यबाण ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ॥ १ ॥
राम ।
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ॥
भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळीती ।
भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळीती ।
सिंहासनी आरुढले जानकी पती ।
सिंहासनी आरुढले जानकी पती ॥ २ ॥
राम ।
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची ।
लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ॥ ३ ॥
राम ।
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ॥
विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
आता मागणे हेची ।
विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ॥ ४ ॥
राम ।
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ॥

जय श्रीराम!!

श्री क्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील श्रीराम दरबार
( फाईल फोटो )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *