देवाभाऊ फाऊंडेशन: नितीन चिलवंत मावळ सहसमन्वयकपदी

Share this News

नागपूर/पुणे दि.१८ (सिटीनामा वृत्तसेवा)
देवाभाऊ फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या मावळ लोकसभा सहसमन्वयकपदी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन चिलवंत यांची नियुक्ती करण्यात आली.
देवाभाऊ फाऊंडेशन, महाराष्ट्र या सामाजिक संघटनेचे संस्थापक मुख्य समन्वयक गजानन जोशी,प्रदेश सहसमन्वयक (संघटन) डॉ.आशुतोष घोलप यांनी पत्रकाद्वारे नियुक्तीची माहिती दिली. देवाभाऊ फाऊंडेशन सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात जनजागृतीपर उपक्रमात अग्रेसर असून संघटनात्मक कार्य सुरू असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
नितीन चिलवंत हे मावळ लोकसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यात सक्रिय असून संघटनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *