पिंपरी दि.१७ (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व
भक्तीशक्ती शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्व २०२६ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचे आयोजन मंगळवार दि.१७, १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजित महापौर निवास मैदान, प्राधिकरण येथे
सायंकाळी ६:३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.या भव्य महानाट्यात ३०० हून अधिक कलाकार व उंट, घोडे यासह सादरीकरण करण्यात होणार आहे. यांसाठी प्रवेश विनामूल्य आहे, नागरिकांनी या भव्य महानाट्य बघण्याचे आवाहन
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीने केले आहे.
