प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेविका सौ.ऐश्वर्या तरस यांचा पुढाकार;आयुक्तांना दिले निवेदन

Share this News

चिंचवड दि.६ (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्र.१६ मधील शिवसेनेच्या नगरसेविका सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेनंतर महानगरपालिकेचे मा.आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन रावेत किवळे साईनगर मामुर्डी भागातील डीपी रस्ते विकसित करण्यासह विविध विकासकामासंबंधी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी रावेत परिसरातील, शिंदे वस्ती, चंद्रभागा कॉर्नर, किवळे, कातळे वस्ती, मामुर्डी परिसरातील डीपी रस्ते विकसित करणे, पदपथ विकसित करणे, रावेत मधील विकास प्राधिकरण हद्दीतील सेक्टर ३२ मध्ये विद्युत दाहिनी विकसित करणे, रावेत भागातील स. नं.९६ आरक्षण क्र.४/१०१ येथे नवीन शाळा इमारत बांधकाम, रावेत येथे टाऊन हॉल, किवळे भागात सांस्कृतिक भवन, किवळे, मामूर्डी, विकासनगर भागातील नाले बांधकाम यासह विविध विकासात्मक कामे सुचवली असून तात्काळ मार्गी लावण्याची मागणी नवनिर्वाचित नगरसेविका सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *